मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील सचीन राजू चव्हाण या इसमाने अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी सचीन चव्हाण यांचा प्रयत्न हाणून पाडला. हा सर्व गोंधळ सीईओ यांच्या कार्यालया समोर घडत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अंगावर पेट्रोल अन हाथात माचिसची काडीपेट्टी असल्याने झेडपीत खळबळ उडाली.
याबाबत सचीन चव्हाण यांनी दिलेल्या माहीती नुसार मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील स्थानीक पुढारपण करणारे माणिक नलावडे यांनी ग्रामपंचायतीची बेकायदेशीर जागा हडप करून व्यापारी गाळे बांधले . या बेकायदेशीर कामकाजाबाबत आंदोलन करण्यात आले तेव्हा झेडपी प्रशासनाकडून गाळे सील करण्यात आले होते. कोणती ही कायदेशीर परवानगी न घेता माणिक नलावडे यांनी सिल तोडून व्यापारी गाळे खुले केले आहेत. यावर कारवाई व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केला. मात्र मोहोळ बीडीओ अन् विस्तारधिकाऱ्यानी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी सीईओ यांच्या कार्यालया बाहेर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडी नंतर वाफळे येथील गाळयांची संपूर्ण माहीती मागवली आहे.आंदोलनकर्ते सचीन चव्हाण यांना माणिक नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याचे सचीन चव्हाण यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.
0 Comments