माढा ! साहेबांना सांगून बक्षीस पत्र प्रमाणे नाव लावण्यासाठी १० हजाराची लाच खाजगी सर्वेअरला रंगेहाथ पकडले



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


माढा तालुक्यातील सीना दारफळ येथे बक्षीस पत्राप्रमाणे मिळकतीवर ग्रामपंचायत दप्तरावर नाव नोंदवण्यासाठी बारा हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी खाजगी फेरसर्व्हर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून रंगेहात पकडले आहे. साहेबाला सांगून तुमचे प्रकरण क्लिअर करून देतो म्हणून ही लाच घेतली आहे.

संतोष पांडूरंग सावत, वय ५१ वर्ष, पद फेर रीव्हीजन सव्र्हेर (खाजगी ) ग्रामपंचायत मौजे दारफळ सिना, ता माढा , व  अनिल मधुकर चव्हाण वय ५५ वर्षे पद फेर रीव्हीजन सव्र्हेर (खाजगी ) ग्रामपंचायत मौजे दारफळ सिना, ता माढा या दोघांना बारा हजाराची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे.

यातील खाजगी फेर सर्व्हेर संतोष सावंत व अनिल चव्हाण हे तक्रारदार यांचे घरी जावून त्यांचे मिळकतीचा सर्व्हे करुन तक्रारदार यांचे वडिलांनी करुन दिलेल्या बक्षीपत्राप्रमाणे तक्रारदाराचे मिळकतीवर साहेबांना सांगुन मौजे दारफळ सिना ग्रामपंचयात दप्तरी नांव नोंद करण्यासाठी १२,००० रु. लाच मागीतली. खाजगी फेर सर्वेअर संतोष पांडूरंग सावंत व अनिल मधुकर चव्हाण यांचे विरुध्द १२,००० रु. लाच मागणी केले बाबत तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापुर येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी प्राप्त झाली होती. सदर तकारीवरुन दि. ३० ऑगस्ट २०२२रोजी व ०५ सप्टेंबर २०२२ रोजी पडताळणी केली असता पडताळणी मधे ग्रामपंचायत दारफळ सिना येथील  संतोष सावंत व अनिल चव्हाण यांनी तडजोडी अंती १०,००० रु.ची मागणी केली त्यानंतर आज रोजी यशस्वी सापळा कारवाई दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने खाजगी फेर सर्केर ग्रामपंचायत दारफळ सिना येथील संतोष सावंत व अनिल चव्हाण यांना ८,००० रु. पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडले आहे. याबाबत माढा सोलापुर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याचे काम चालु आहे.

ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर, पोलीस अंमलदार पोना प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, पोकॉ उमेश पवार, सलीम मुल्ला सर्व नेमणूक अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

Post a Comment

0 Comments