बार्शी कुर्डूवाडी रोडवर तावरवाडी शिवारामध्ये २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे. हा एक पिकअप व दोन ट्रक समोरासमोर येऊन अपघात झाला, यामध्ये आयशर ट्रकचा चालक जागीच मृत्यू झाला.
सायबा शेख (वय १८) यांच्या पायाला गंभीर इजा झाली व असलम शेख (वय२८) यांना इजा झाली. अज्ञात व्यक्तीने घटना पाहिल्यानंतर १०८ या नंबर वर कॉल केल्यानंतर डॉक्टर अक्षय गव्हाणे व ड्रायव्हर करण जाधव तातडीने ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना घेऊन सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केले. 108 ॲम्बुलन्सने तातडीने पोहोचल्याने दोन्ही रुग्णांचे प्राण वाचले.
0 Comments