तृतीयपंथीय व्यक्तींच जीवन


पुण्यात एक तृतीयपंथीय व्यक्ती भेटली, मी एक शॉप मध्ये कलाकृती करत बसलो असता, तिची नजर कलाकृतीवर पडली आणि, माझ्या कलाकृतीचे कौतुक केले.
पण तिच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून थोडं त्याच्या लाईफ बद्दल विचारावं असं वाटलं,
मुळची  लातूरची, दहावी अकरावीपर्यंत सर्वसामान्य मुलांसारखं जीवन जगलेला व्यक्ती नंतर जेव्हा, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना फील झाली त्यावेळी, ती कुटुंबापासून अलिप्त राहिला लागली, लोकांचे टोमणे समाजाची बघण्याची नजर, या गोष्टीने , सर्व सोडून मुंबईत आली आणि नंतर मुंबईतून पुण्यात,
मित्रांनो ही पोस्ट विशेष त्या गोष्टीसाठी की, आज सर्वसामान्य व्यक्ती या लोकांकडे, वाईट नजरेने उपभोवण्याच साधन म्हणून पाहतात, परंतु त्या व्यक्तीला त्याच्या लाईफ बद्दल काय वाटत असेल याला कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का.
हिजडा ,किन्नर, छक्का, या शब्दात त्याची अवहेलना केली जाते.
त्याला नको तिथे स्पर्श करून, समाजापासून वेगळ राहायला ही माणसं भाग पाडतात.
आणि समजा जर, उद्या तुमच्याच, घरात, असं कोणी निर्माण झालं तर, त्यालाही किन्नर ,हिजडा, या शब्दात बोलणार का.
वैयक्तिक कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही परंतु, समाजामध्ये अशा खूप व्यक्ती भेटतात , शक्य होत नसेल तर मदत राहू द्या पण, त्यांच्या , भावना दुखावतील अशा प्रकारे त्यांची कधीही अवहेलना मात्र करू नका.
बराच वेळ चर्चा केल्यानंतर, आपली कुणीतरी एवढी सकारात्मकपणे विचारपूस केली तेव्हा मात्र, त्या व्यक्तीला खरोखरच मनापासून आनंद झाला असेल,
समाजामध्ये आमच्याकडे बऱ्याच लोकांच्या बघण्याच्या नजरा या, वासनदास नजरा आहेत, पण आजच्या दुनियेत तुमच्यासारखी माणसं कुठेतरी तुरळक भेटतात आणि तुम्ही मनापासून, माझ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्याचं समाधान वाटलं म्हणून, त्या व्यक्तीने सोबत सेल्फी घेतला.
आज ती व्यक्ती कोणाकडेही अपेक्षा न ठेवता स्वतःचा आयुष्य समाधान पूर्वक आणि व्यवस्थित जगत आहे, आणि एवढे करून ती व्यक्ती तिच्या कुटुंबाला पैसे देखील पाठवत आहे.

चित्रकार महेश मस्के
9881463806.

Post a Comment

0 Comments