सोलापुरात विसर्जन करताना महावितरण कर्मचाऱ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू



सोलापुरात महावितरत कर्मचाऱ्याचा गणेश विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. विजय भीमाशंकर पनशेट्टी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या घटनेने हतुरे वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे कारण विजय पनशेट्टीला चार वर्षाचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पत्नीने देखील आत्महत्या केली होती. आपल्या आई वडिलांसोबत विजय आपल्या चार वर्षीय मुलाचा सांभाळ करत होता. 

सर्व निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.विजय पनशेट्टी हा या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. 9 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला पण विजय पनशेट्टी सापडला नाही. पहाटेच्या सुमारास जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Post a Comment

0 Comments