अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वर्षाची शिक्षा मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
सोलापूर - यात हकीकत अशी की, आरोपी तात्या भरत पांडुरंग रोकडे वय-24 रा. मोरखंची, ता. मोहोळ, जि. सोलापूर याने पिडीत मुलगी अल्पवीयन असल्याचे माहित
असून देखील ती घरी एकटी असल्याचा फायदा घेवून पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश करुन तिचा विनयभंग केला. सदरच्या
अनपेक्षित घटनेमुळे पिडीता घाबरुन जावून घराच्या बाहेर पळाली व समोरच्या घरासमोर बसलेल्या स्त्रिकडे जावून तिने मदत मागितली व रडत रडत तिला घडलेली घटना सांगितली.
त्याचदरम्यान बाजारासाठी शेजारच्या गावात गेलेली तिची आई परत आली पिडीता रडत असलेली पाहून तिने चौकशी केली असता तिने आईलाही घटना सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आईने मोहोळ पोलीस ठाणे या ठिकाणी आरोपीविरुध्द फिर्याद दाखल केली. त्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी यांनी करून आरोपी विरुध्द दोषारोपपत्र पाठविले. सदर प्रकरण मा. श्री व्ही. पी. आव्हाड साहेब, अति. जिल्हा न्यायाधीश व स्पे पोक्सो न्यायाधीश, सोलापूर यांचे समोर चालले. सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकूण २५ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पिडीता फिर्यादी व तपासी अधिकारी यांची साक्ष व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी तात्या भरत पांडुरंग रोकडे यास भा.द.वि. कलम ३५४ नुसार एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आणि पोक्सो ८ अन्वये दोषी धरण्यात आले व त्यास तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व त्यापैकी पाच हजार रुपये पिडीतेस देण्याचे आदेश मा. न्यायालयाने पारित केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील म्हणून शीतल आ. डोके यांनी काम पाहिले. फिर्यादीतर्फे अॅङ सुनयना थोरात यांनी काम पाहिले. तपासिक अमलदार म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी यांनी व कोर्ट पैरवी म्हणून पोको धर्मे यांनी काम पाहिले.
0 Comments