बार्शीमध्ये भरदिवसा घरफोडी; साडेपाच लाख किमतीचे सोन्याचे दागिने पळवले


बार्शी |

बार्शी शहरांमध्ये भर दिवसा घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधत कडी कोयता तोडून घरातील साडेपाच लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत, या घटनेची फिर्याद श्रीकांत रामभाऊ दराडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हे सासरे आजारी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह 18 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बार्शी तालुक्यातील भालगाव येथे गेले होते. रात्री अकरा वाजता च्या दरम्यान घरी परतल्यावर त्यांना घर फोडण्याचा प्रकार लक्षात आला. कपाटातील एका डब्यामध्ये ठेवलेले सोन्याच्या पाटल्या, वेल, ठुशी व लॉकेट असा साडेपाच लाख किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. फिर्यादीने दिलेला तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments