उजवा हात जेलमध्ये गेला आता डावाही जाणार; सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा




 शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे विश्वासू सहकारी यांना कायमचं टार्गेट करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना चुचकारलं आहे. तुमचा उजवा हात जेलमध्ये गेला आता डावा हातही जेलमध्ये जाणार अशा शब्दांत सोमय्यांनी ठाकरेंना इशारा दिला आहे.

गेल्या वर्षी गणरायाला निरोप देत होतो तेव्हा मला अटक करण्याचा प्रयत्न झाला. पण आज सबंध महाराष्ट्र जेलमधून बाहेर आला आहे, मी गणपती बाप्पाला प्रार्थना केली विघ्नहर्ता म्हणून आलो. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे गेला, त्याला विकास पथावर न्यायचं आहे. पण एक गोष्ट खरी आहे. उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात जेलमध्ये गेला आता डावा हात पण जाणार, स्वतःच्या पोराची काळजी करा.

 ज्या दिवशी ठाकरे सरकार गेलं तेव्हा राज्यावरचं अमंगल संपलं, अशा शब्दांत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला. आज दुपारी साडेचार वाजता महापालिकेने आदित्य ठाकरे आणि असलम भाईच्या मड आयलंडची चौकशी करणार आहे. त्यात पर्यावरण खात्याने गैरव्यवहार केला. आदित्य ठाकरेंना अधिकार नसताना त्याला २१ नोव्हेंबर २०२१ला बेकायदेशीर परवानगी दिली.

Post a Comment

0 Comments