गुळपोळीसह बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील मंजूर कामे ज्या कामाचे ईटेंडर होत नाही अशी कामे म्हणजे तीन लाख रुपयांच्या आतील कामे बहू लिफाफा पध्दती नुसार निवीदा मागवून नोंदणीकृत अनुभवी ठेकेदाराकडून करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी केली आहे .
ग्रामपंचायतीमधील शासनाची तीन लाखाच्या आतील कामाचे बहू लिफाफा पध्दतीने निवीदा मागवून नोंदणीकृत अनुभवी इच्छुक ठेकेदाराकडून निवीदा मागवून, बयाणा स्वीकृत करुन, दैनिक लोकमत, सकाळ सारख्या दैनिकातून सदर कामाची निवीदा जाहीर प्रसिद्धीकरण करुन, निवीदा मागवून ठेकेदाराकडून उत्तम कामे करून घेण्यात यावी जेणेकरून बिलो रकमेतून ग्रामपंचायत चे पैसे वाचतील व ग्रामपंचायतला उत्पन्न, ग्राम निधी मिळेल व ग्रामपंचायती सक्षम होतील म्हणून तीन लाख रुपयाच्या आतील सर्व कामे बहू लिफाफा पध्दतीने करण्यात यावी. अन्यथा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सूर्यकांत चिकणे यांनी दिला आहे, सदर निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी बार्शी, सोलापूूर जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ,जिल्हाधीकारी सोलापूर, मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
0 Comments