सोलापूर ! दोड्डी तांडा येथे हातभट्टी दारु अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा



3 लाख 59 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात टाकलेल्या छाप्यात एका मोटरसायकलीसह 5 हजार 165 लिटर हातभट्टी दारू व 1 टन 110 किलो गुळ पावडर जप्त करून गुन्ह्यात 3 लाख 59 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप,अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनिल चव्हाण,विभागीय उप आयुक्त पुणे विभाग अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांचे नेतृत्वात उपअधीक्षक आदित्य पवार,निरीक्षक अ विभाग संभाजी फडतरे,निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे,दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ,अंकुश आवताडे,सुरेश झगडे,सुनिल पाटील,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर,बिराजदार,मुकेश चव्हाण,जवान ईस्माईल गोडीकट,अनिल पांढरे,प्रशांत इंगोले,प्रकाश सावंत,प्रियंका कुटे,शोएब बेगमपुरे,वाहनचालक संजय नवले व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments