शिंदे फडणवीस सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यावर तोडगा काढत तात्पुरते पालकमंत्री नियुक्ती करण्याच्या हालचाली चालू आहेत. सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्र्याची तात्पुरती धुरा सांगलीचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्या खांद्यावर दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मंत्रिमडळाचा विस्तार झाल्यानंतर सोलापूर जिल्हयाला कायमचा पालकमंत्री मिळणार आहे. यासाठी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आमदार राजा राऊत यांच्यात जोरदार लॉबिंग चालू असल्याची राजकीय गोटात चर्चा चालू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात शिंदे फडवणीस सरकार आले. दोघे राज्याचा कारभार चालवत राहिले. अखेर सम्बल एका महिण्यानंतर पहिला मंत्रिमडळ विस्तार झाला भाजप आणि शिंदे गटाच्या मिळून १८ कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र दूसरा मंत्रिमंडळाचा गुहूर्त सापडला नाही.
मंत्रिमंडळ विस्तार रखल्यामुळे अनेक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. परिणामी प्रशासकीय कामावर काहीसा परिणाम झाला असला तरी अनेक धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. जिल्हा नियोजन समितीचा कारभार ठप्प झाला आहे. आहे. यापूर्वीच्या सरकारमान्यता दिलेल्या
नियोजन समितीचा आराखडा तयार करण्याचे काम रखडल्याने चालू आर्थिक वर्षातील आराखडा तयार करण्याचे काम रखडले आहे. ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांचा विस्तार करून कायमस्वरूपी पालकमंत्री नियुक्त करण्यास लागलेला वेळ पाहता यावर मार्ग काढत शिंदे फडणवीस सरकारने तात्पुरते पालकमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदाचे वाटप केले जाणार आहे. सोलापूरचे पालकमंत्रीपद सांगलीचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पुन्हा १८ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यास पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजपचाच सहयोगी आमदार राजा राऊत यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे देशमुख आणि राऊत यांनी गॉडफादर उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जोरदार लॉबिंग केले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पालक मंत्रिपदासाठी देशमुख आणि राऊत यांच्यात जोरदार रस्सीखेच चालू असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.
0 Comments