...तर तुमच्या सर्वोच्च पदाचा उपयोग काय? ओमराजे निंबाळकरांचा एकनाथ शिंदेंना टोला



राज्याचे सर्वोच्च पद मिळविल्यानंतरही आपल्या फेसबुकच्या कमेंटचा बॉक्स बंद करावा लागत असेल तर लोकांची भावना काय आहे हे समजायला हवे असा, टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लगावला. 

खोके, पेट्या लाथाडुन आम्ही निष्टेने पक्षाबरोबर राहिलो, कारण गद्दारी आमच्या रक्तात नाही, असेही त्यांनी सुनावले. एका अपेक्षेने मतदार लोकप्रतिनिधीना मतदान करतात, त्यांना निवडुन आणण्यासाठी हजारो कार्यकर्ते जीवाचे रान करतात. ज्या विश्वासाने आमदार, खासदार निवडुन येतो, त्या मतदाराला देखील आता खाली मान घालायची वेळ आली आहे. असेही यावेळी त्यांनी सुनावले.

Post a Comment

0 Comments