सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


 उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी(आ) येथील राम धर्मा गुंड (वय ५८) ह्या शेतकऱ्याने (दि.१९) सततची नापिकी आणि बँकेच्या घेतलेल्या कर्जास कंटाळून स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडोळी(आ) येथील अल्पभूधारक शेतकरी राम धर्मा गुंड यांना पाडोळी(आ) शिवारातील गट नंबर ४३० मध्ये अवघी ९३ गुंटे इतकी जमीन असून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह  हे शेतातील उत्पन्नावरच भागवत असत मात्र यावर्षी त्यांनी आपल्या शेतात तीन वेळेस  सोयाबीनचे बियाणे पेरून देखील ते उगवले नसल्याने ते नैराश्यात होते आणि त्यातूनच उस्मानाबाद येथील एका पतसंस्थेचे कर्ज फेडाचे कसे? या चिंतेने त्यांनी आपली गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुले ,दोन सुना आणि नातू असून पुढील तपास बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.माने हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments