नात्याला काळीमा फासणारी घटना ; दाजींनीच केला मेव्हणीवर अत्याचार

 

बार्शी |

मोठया बहीणीकडे राहण्यास आलेल्या बहीणीवर भाऊजीन अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत स्वतः पीडितेने मोठ्या बहीणीकडे तक्रार केल्यानंतर तिने काहीच भाऊजींची साथ दिल्याने पीडितेने पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून बहीण व बहिणीचा नवरा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

याविषयी सविस्तरवर असे की, पीडिता व पती याचेत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण झालेने बार्शी येथे बहिणीच्या घरी आली होती. राहत असताना घरामध्ये बहिणीच्या नवर्याने पीडितेशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. दुपारच्यावेळी घरामध्ये कोणी नसताना भाउजीने पिडीतास माझ्यासोबत राहिली नाहीस तर मी तुझ्या नवऱ्याला व मुलीला मारून टाकतो, अशी धमकी दिली. तिला धक्काबुक्की करून अत्याचार केले. पिडीताने बहीणीला घडलेला प्रकार सांगितला. बहीणीने पीडिताचे काही न ऐकुन घेता ते सांगतात तसे वाग. काही होणार नाही, असे म्हणून साथ देत पीडितेस मारहाण केली. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments