भारतीय क्रिकेटचा सलामीवीर के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार हे दोघ विवाहबंधनात लवकरच अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून अनेकांना उत्सुकता होती.
के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी दीर्घकाळ रिलेशनशिप मध्ये आहे. हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या सट्टेबाजीचा बाजार सातत्याने तापत होता. पण बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच सुनील शेट्टी याच्या घरी शहनाई वाजणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पुढील वर्षी जानेवारी 2023मध्ये हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. T20 विश्वचषकानंतर ते लग्न करणार आहेत.
केएल राहुल-अथिया शेट्टी राहतात एकत्र मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे महाराष्ट्रात विवाह करणार आहेत. पुढील वर्षी पहिल्या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चाहत्यांना इतकी उत्सुकता आहे की, या जोडीबद्दल नेहमीच काही ना काही अफवा असतात. असे सांगितले जात आहे की केएल राहुल आणि अथिया शेट्टी यापूर्वी एकाच घरात शिफ्ट झाले आहेत आणि दोघेही लग्नापूर्वी
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मुंबईतील
कार्टर रोडवर त्यांनी घर घेतले आहे.
सुनील शेट्टी याची राहुल-अथिया यांना मोकळीक
राहुल आणि अथिया लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या बातम्या समोर आल्यावर त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा जोर धरला. सुनील शेट्टी याने याबाबतची स्पष्टता व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “मला वाटतं मुलांनी ठरवलं आहे. ते त्यांचा निर्णय घेतील. राहुलला आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर आणि ऑस्ट्रेलिया टूर आहे. जे मुलं ठरवतील त्याप्रमाणे होईल. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना वेळ मिळेल त्यावेळी ते लग्न करतील. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथून परतल्यानंतर महाराष्ट्रात हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहेत.
0 Comments