सोलापूर |
केंद्रीय गुप्तचर संस्था व स्थानिक पोलिसांनी सोमवारी पहाटे सोलापूर शहरातील असिफ शौकत शेख(वय 40 वर्ष,रा सहारा नगर,सोलापूर) यास ताब्यात घेतले होते.CRCP कलम 151-3 नुसार ताब्यात घेतले होते.न्यायधंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांच्या कोर्टात हजर केले असता,न्यायालयाने असिफ शेखला 6 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.यामध्ये ऍड रियाज शेख यांनी आरोपी तर्फे युक्तिवाद केला तर पोलिसांतर्फे ऍड सार्थक चिवरे यांनी युक्तिवाद केला.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सोलापुरातील पीएफआयच्या असिफ शेख याला 9 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.नवरात्र काळात सुरक्षा व्यवस्थेचे कारण समोर करत असिफला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांची मागणी मान्य करत न्यायालयाने आसिफची नऊ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेतले होते-
राज्यभरात पीएफआयच्या कार्यालयावर गुप्तचर खात्याच्या कारवाया सुरू आहेत.सोलापुरातील पीएफआयचा कार्यकर्ता म्हणून असिफ शेख हा सोलापूर पोलिसांच्या नजरेत होता.स्थानिक गुप्तचर संस्थांच्या रडारवर देखील असिफ शेख होता.त्याबाबत सर्व माहिती स्थानिक पोलिसांनी जमा करून घेतली होती.सोलापुरातील शांतता बाधित होऊ नये म्हणून पोलिसांनी असिफ शेखला ताब्यात घेतले होते.
शांतता प्रस्थापित राहावी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई-
सोलापूर स्थानिक पोलिसांनी व गुप्तचर संस्थांनी सतर्कता बाळगत असिफ शेखवर प्रतिबंधात्मक कारवाई करत CRCP कलम 153-3 नुसार ताब्यात घेतले आहे.26 तारखेपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे.ऐन सणासुदीला शहरातील शांतता भंग होऊ नये म्हणून असिफला सोमवारी पहाटे 27 सप्टेंबर रोजी सहारा नगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.सोमवारी दुपारी कोर्टात हजर केले .असिफ शेख तर्फे कोर्टात ऍड रियाझ शेख यांनी युक्तिवाद केला.सरकारी पक्ष व आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून कोर्टाने 9 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.याबाबत अधिक देताना ऍड रियाझ शेख यांनी सांगितले की,6 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे.
0 Comments