मोठा अनर्थ टळला;रुळावर दगड ठेवून के.के.एक्सप्रेस थांबवण्याचा प्रयत्न
दौंड आरपीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर-जिंती पारेवाडी दरम्यान रुळावर दगडं ठेवून के के एक्सप्रेस थांबवण्याचा प्रयत्न अज्ञात इसमानी केला आहे.मोठंमोठी दगडं ठेवण्यात आल्याने के.के एक्सप्रेस 2 ते 3 मिनिटे थाम्बली होती.ही घटना शनिवारी रात्री 9.21 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.केके एक्सप्रेसवर मोठा बंदोबस्त असल्याने आणि रुळावर एस्कॉर्ट असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.जिंती पारेवाडी दरम्यान एक्सप्रेस गाड्यांना अडवून प्रवाशांची लूटमार नेहमी होत असते.कोणतीही एक्सप्रेस जाताना जिंती पारेवाडी दरम्यान एक्सप्रेस गाड्यांवर दगडफेक देखील होत असते.रेल्वे प्रशासन एवढे अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवत असले तरी कित्येक वर्षांपासून जिंती पारेवाडी दरम्यान असलेली लूटमार थांबवायला अपयशी ठरत आहे.
शनिवारी रात्री के के एक्सप्रेस थांबविण्याचा प्रयत्न-
शनिवारी 3 सप्टेंबर रोजी रात्री 9.21 वाजण्याच्या सुमारास जिंती ते पारेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे की.मी.312 जवळ डाऊन रेल्वे ट्रॅक वर मोठं दगड ठेऊन गाडी क्र.12628 डाऊन के.के.एक्स ला अडथळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.अज्ञात इसमाने एक्सप्रेस थांबवण्याचा प्रयत्न केला.या घटनेनंतर के.के.एक्सप्रेस 2 ते 3 मिनिटे थांबून पुढे मार्गस्थ झाली.
रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला-
के.के एक्सप्रेस ही बंगलोर येथून सुरू होते आणि दिल्ली पर्यंत धावते.अतिशय उच्चभ्रू प्रवाशी यामध्ये प्रवास करतात.रेल्वे प्रशासन या एक्सप्रेस गाडीवर योग्य ते एस्कॉर्टिग व बंदोबस्त ठेवत असते.शनिवारी हे सुरक्षा अधिकारी अलर्ट असल्याने वेळीच त्या ठिकाणावरील रेल्वे रुळावरील दगड बाजूला काढण्यात आले.के.के एक्सप्रेसला 2 ते 3 मिनिटांचा थांबा देत सर्व दगड बाजूला करण्यात आली.आणि पुढे मार्गस्थ केली.याबाबत अज्ञात इसमा विरोधात दौंड येथील आरपीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments