सिविल हॉस्पिटल मध्ये लागणारे अद्यावत मशनरी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार : मंगेश चिवटे



सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या अत्याधुनिक मशनरी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करणार शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे आश्वासन दिले आहे.

सोलापूर येथील सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या अत्याधुनिक मशनरी उपलब्ध होण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून निश्चितपणे  प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्र्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून मंगेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला. 

येणाऱ्या काळात धर्मादाय हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी राज्यातील ज्यांच्याकडे केशरी व पिवळी शिधापत्रिका आहे अशा गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध व्हावेत,म्हणून आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री,धर्मादाय आयुक्त आणि संबंधित हॉस्पिटलचे सीईओ यांची मुंबईत बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केरळा महापौर आल्यानंतर त्या वेळी महाराष्ट्र सरकारच्यावतीने तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे पंधरा दिवस मुक्काम करून या भागातील नागरिकांना मदत केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. भविष्यामध्ये  करमाळ्यात गरजू रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर चालू करण्याचा आपला मानस असल्याचेही ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments