बार्शीतील देखाव्यांमध्ये आमदार शहाजी पाटील यांच्या डायलॉगची भुरळ, गुवाहाटी येथील हॉटेलचे राऊत कुटुंबीयांकडून वर्णन


यंदाच्या वर्षी राज्याच्या राजकारणामध्ये अनपेक्षित असणाऱ्या घडामोडी घडले. राज्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. या सर्वांचे पडसाद राज्यभर उमटले राज्यात सध्या गौरी गणपतीची धामधूम सुरू आहे. गौरी गणपतीच्या देखावामध्ये राजकीय देखावे सादर केले जात आहेत. बार्शी शहरातील राऊत कुटुंबीयांनी मुंबई ते गोवा झालेला राजकीय प्रवास तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रसिद्ध असणारा डायलॉग वापरून आकर्षक देखावा उभारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारची उपाधी दिली आहे

शिंदे गटातील आमदारांनी मुंबई सुरत गुवाहाटी गोवा असा प्रवास करून महाराष्ट्रातील सत्ता खाली खेचली होती. गुवाहाटी येथील radisson हॉटेलमध्ये शिंदे गटाचे आमदार मुक्कामी होते. त्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी कॉल द्वारे केलेला कार्यकर्त्यांचा संवाद तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या संवादाचा देखावा राऊत कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या गुवाहाटी हॉटेल बाहेर केलेल्या निसर्गाचे वर्णन देखण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments