महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंगा प्रकरणावरून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान आमदार रवी राणा यांच्या मालकीच्या भानखेडा शिवारातील गोडाऊनमधून अॅल्युमिनियमचे भोंगे, एम्प्लिफायर, साड्या तथा किराणा साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. गोडाऊन किपरच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
राणा यांच्या मालकीच्या दोन गोडाऊनमध्ये गरीब, गरजूंना वाटण्यासाठी किराणा साहित्य ठेवण्यात आले होते. 4 सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास सुशील ठाकूर हे त्या गोडाऊनमध्ये गेले असता, त्यांना दाराची जाळी तुटलेली दिसली. किराणा साहित्य अस्ताव्यस्त दिसले. त्या चोरीची माहिती आमदार राणा यांना देण्यात आली. पाहणी केली असता किराणा साहित्यासह तब्बल 5 लाख 58 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज लांबवल्याचे लक्षात आले.
1.55 लाखाचे खाद्यतेल, 600 किलो साखर, 500 पॅकेट चना डाळ, 100 साड्या, ॲल्युमिनियमचे 37 भोंगे, 63 एम्प्लिफायर, 58 जिओ टॅग युनिट एवढा सगळा माल चोरट्यांनी राणा कुटुंबियांच्या गोडावून मधून चोरला आहे. दरम्यान या चोरीची तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments