नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्षांनी व्हाट्सअप कॉलद्वारे धमकी दिल्याच आरोप; पोलीस आयुक्त व पोलीस ठाण्यात दिले तक्रारी निवेदन



सोलापूर/प्रतिनिधी:


भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मला 29 जुलै 2022 रोजी व्हाट्सअप कॉल करून धमकी दिली असा गंभीर आरोप करत डॉ संदीप आडके यांनी पोलीस आयुक्त व सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रारी निवेदन दिले आहे. काही दिवसांपूर्वी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. आता त्याच पोलीस ठाण्यात उच्च शिक्षित
अस्थीरोग तज्ञ डॉ संदीप आडके यांनी भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार सचिन कल्याणशेट्टी विरोधात तक्रारी निवेदन दिले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सोलापुरातील नियमित विमानसेवेबाबत प्रश्न विचारा असे डॉ संदीप आडके यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना सांगितले होते. यावरून हे प्रकरण घडले असे डॉ संदीप आडके यांनी माहिती देताना
सांगितले.

सोलापूरच्या विमानसेवेबाबत विधानसभेत लक्षवेधी
प्रश्न विचारा असे सांगितले होते-

डॉ संदीप आडके हे आपल्या वैद्यकीय सेवे सोबत सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्य देखील करतात. सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून डॉ संदीप आडके व त्यांच्या सहकाऱ्यांचा सोलापूरला नियमित विमानसेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे. पावसाळी अधिवेशनात सोलापूरच्या आमदारांनी लक्षवेधी प्रश्न करताना विधानसभेत सोलापूरला विमानसेवा कधी सुरु होणार याबाबत प्रश्न विचारा असे डॉ संदीप आडके यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना सांगितले होते. यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी 29 जुलै रोजी व्हाट्सकॉल करून आक्षेपार्ह व असंवैधानिक भाषेत धमकी दिल्याचा आरोप डॉ आडके यांनी केला आहे.

तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्षांवर याच पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल -
डॉ संदीप आडके यांचे रुग्णालय सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. रुग्णसेवा करताना भाजपच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा मला व्हाट्सअप कॉल आला. आणि त्यांनी मला आक्षेपार्ह व अ संवैधानिक शब्दात धमकी दिली. असा आरोप यावेळी डॉक्टरांनी केला आहे. यापूर्वी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूममधील व्हिडीओ वायरल झाला होता. त्यांनतर सदर बाजार पोलीस ठाणे येथे एका महिलेने श्रीकांत देशमुखा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पक्षश्रेष्टींनी श्रीकांत देशमुखयांचा राजीनामा मंजूर केला होता. आता याच पोलीस ठाण्यात नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष व अक्कलकोट विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी विरोधात तक्रारी निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments