"भाजपचे 100 हुन अधिक आमदार आणा, मुख्यमंत्री बना!



समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना खुली ऑफर दिली असून त्यांनी "भाजपचे 100 आमदार आणा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ", असे म्हटले आहे.

एका न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले, "जर त्यांच्यात हिंमत असेल आणि त्यांच्यासोबत आमदार असतील. एकदा ते सांगत होते की त्यांचे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत. तर आजही आमदार आणा. त्याला समाजवादी पक्ष पाठिंबा देईल. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे".

Post a Comment

0 Comments