सोलापूर! MIM पक्षाला मोठे खिंडार, सहा नगरसेवकांचा जयंत पाटलाच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश


 सोलापूर शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तोफिक शेख हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तोफिक शेख यांच्यासह एमआयएम पक्षाचे सहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आहेत. त्यामुळे एमआयएम पक्षाला सोलापुरात मोठे खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रवेश घेतला आहे. 


2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन एमआयएम पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष तोफिक शेख यांनी 9 नगरसेवक निवडून आणले होते. विजापूर येथील कॉंग्रेस महिला पदाधिकाऱ्याच्या खुनाच्या आरोपात तोफीक शेख हे कारागृहात होते. याशिवाय सोलापूर शहरात तोफिक शेख यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हे दाखल असलेल्या शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवेश दिला जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments