झी मराठीवर नुकताच बस बाई बस हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे होस्ट सुबोध भावे आहेत. महिलांसाठी हा स्पेशल कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही दिलखुलास गप्पा मारल्या.
आता अमृता यांचा या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यांना सुबोध भावेंनी एक प्रश्न विचारला , कशी नशिबाने आज थट्टा मांडली हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो?, त्यावर त्या म्हणाल्या उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांचाच चेहरा आठवला. अमृता यांनी उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल असं उत्तर दिल्याने सोशल मीडियावर त्या ट्रोल होत आहेत.
एका प्रोमोमध्ये अमृता यांना, मामी या ओळखेबद्दल काय वाटतं, असा प्रश्न एक महिला विचारते, त्यावर अमृता यांनी स्पष्ट उत्तर दिलं. त्या म्हणाल्या मला तर मामी म्हणून संबोधतात ते फार आवडतं. मला फार मजा येते.
0 Comments