वैरागमध्ये बिल मागितल्याने हॉटेल मॅनेजरला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल


वैराग/प्रतिनिधी:

 जेवण व दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून करून मारहाण मॅनेजरच्या खिशातील दीड हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी संशयित आरोपी अजय काळे व त्याचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


वैरागमध्ये १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ दरम्यान वैरागमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी संतोष बालाजी रनपुरे यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान प्रीतम बियर बार अँड रेस्टॉरंट मध्ये हॉटेलवर २० नंबरच्या परमिट रूमवर तिघेजण आले. ते तिघेजण दारू प्यायले. त्याचे बिल ३७५ रुपये झाले. कोणतेही हॉटेल मालक जेवणाचे व दारूचे पैसे मागत नाहीत, तू आम्हाला ओळखत नाहीस का, असे म्हणत हॉटेल मॅनेजरला दमदाटी केली व त्याच्या खिशातील दीड हजार रुपयेही काढून घेतले, रणपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघाजणावर भादवी कलम ३४,३९२,५०४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments