संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत



काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आणि काॅंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शेख यांनी कोरोना काळात मलाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात बांधकामास मदत केली. त्यांनी मढ परिसरात तब्बल 28 फिल्म स्टुडिओचे कमर्शियल बांधकाम सुरू केले आहे. त्यातील  पाच स्टुडिओ हे सीआरझेड झोनमध्ये येत आहे. तसेच यात 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.


आता आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ- मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा अधिकारी यांनी कठोर कारवाई करावी, असे आदेश या नोटीसद्वारे करण्यात आले आहेत. त्यामुळे अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments