बार्शी ! शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी छावा संघटना आक्रमक



अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने, तहसिलदार बार्शी यांना तालुक्यातील सर्व मंडळातील पिकाचे पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे आज दि. १२.८.२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता निवेदन देण्यात आले.

बार्शी तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा यावर्षी जास्त पाऊस झाला आहे.  या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील सोयाबीन, उडीद, मूग, मका, कांदा, बाजरी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तालुक्यातील 10 मंडळापैकी 2 मंडळातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित 8 मंडळातील पिकांचे पंचनामे करून, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशाप्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष धिरज शेळके, शहराध्यक्ष निलेश पवार, शहर उपाध्यक्ष चंदन लांडगे, महिला आघाडी अध्यक्षा मिताली गरड पाटील, कार्याध्यक्षा वैशाली ढगे, सहसचिव प्रतिज्ञा गायकवाड, विकी गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments