सोलापूर ! दुभाजक तोडून कार कंटेनरला धडकली; दोघीचा जागीच मृत्यू



पुण्याचा दिशेने भरधाव जाणारी कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून कार व कंटेनरला धडकली. यात कारमधील दोघी जागीच ठार झाल्या. यात माधुरी मल्लिनाथ चितकोटी (वय ३०) आणि सानवी मयूर पाटील (वय ५) यांचा समावेश आहे.

सलिम अब्दुल सय्यद, दिलीप सायप्पा गायकवाड, संगीता मयूर पाटील, मीरा मल्लिनाथ चितकोटी (सर्व रा. सोलापूर) जखमी झाले. ही घटना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अकुंभे (ता. माढा) गावचा हद्दीत घडली. कार (एमएच १३ आरके ४७७४) दुभाजक ओलांडून सोलापूरचा दिशेने निघालेल्या कारला (एमएच १३ एझेड २५२९) धडकली.

कारमधील माधुरी बाहेर फेकल्या जाऊन कंटेनरवर (एमएच १३ टीव्ही ६५७८)वर आदळल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आशिष शिवराज पाल (वय २३, धंदा चालक रा. दुल्हापूर, ता. मिर्जापूर) यांनी कारचालक मयूर मल्लिनाथ पाटील (रा. सोलापूर) याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Post a Comment

0 Comments