सांगोला! विदेशातून महागडे गिफ्ट पाठवण्याचे अमिष ; शिक्षकाला साडेबारा लाखाला लावला चुना


सांगोला/प्रतिनिधी:

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीच्या आधारे लंडन येथून गिफ्ट व पैसे पाठविण्याचे अमिष दाखवून खात्यावर पैसे टाकायला लावून एका शिक्षकाची १२ लाख ३७ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागनाथ भिमराव दुधाळ रा. वासुदरोड दत्तनगर, सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी महिलेविरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Advertise)

याबाबत अधिक माहिती अशी, नागनाथ भिमराव दुधाळ या शिक्षकाची डिसेंबर २०२१ मध्ये फेसबुकवर लंडन, युनायटेड किंग्डम येथील एलिझाबेथ स्मिथ नामक महिलेशी मैत्री झाली. त्यानंतर स्मिथ नामक महिलेने याने फिर्यादी नागनाथ दुधाळ या शिक्षकाला लंडनहून गिफ्ट व पौंड स्वरूपात असलेला चेक पाठविण्याचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. गिफ्ट घरपोच मिळेल याची खात्री देत अनोळखी महिलेने कुरिअर कंपनीला व्हेरिफिकेशन करायचे आहे असे सांगत फिर्यादी नागनाथ दुधाळ यांना फोन करून विदेशातून आलेले गिफ्ट दिलेल्या पत्त्यावर गिफ्ट पोहोच करण्यासाठी कुरिअर चार्जे स म्हणून रुपये ३५ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच गिफ्टमध्ये ५० हजार ब्रिटिश पौंड रक्कम असलेला चेक असल्याने रजिस्ट्रेशन फी स्वरूपात एक लाख रुपये भरण्यास सांगितले. तसेच पौंडची रक्कम भारतीय चलनात रूपांतर करण्यासाठी आणखी १ लाख ५८ हजार ९०० भरण्यास सांगितले. त्यानंतर अनोळखी महिलेने दुधाळ यांना फोन करून ५ लाख ३ हजार ४०० रुपये इन्कम टॅक्स स्वरूपात भरण्यास सांगितले. आणखी २ लाख ५५ हजार ७०० भरावे लागतील असा मेसेज दुधाळ यांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर आय. एम. एफ. कोडसाठी ६ लाख ९ हजार ३०० रुपये इतकी रक्कम भरावी लागेल असे सांगितले. सदरची रक्कम रीफंडेबल असल्याचे सांगितले. मात्र, सदरची रक्कम भरणे अशक्य असल्याचे इतकी रक्कम भरणार नसल्याचे नागनाथ दुधाळ यांनी सांगितले.


दरम्यान, तुम्ही ४ लाख ५० हजार रुपये भरलेले आहेत, तुम्ही राहिलेली रक्कम भरा, प्रक्रिया पूर्ण होईल असा मेसेज लंडन मधील अनोळखी मुलीचा दुधाळ यांच्या मोबाईलवर आला. त्यामुळे दुधाळ यांनी १ लाख ५९ हजार ३०० रुपये फोन पे द्वारे भरले. कुरिअरला उशीर झाल्याने लेट चार्जेस ३५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र, पैसे पाठविल्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. लंडन येथील अनोळखी महिलेने शिक्षक नागनाथ दुधाळ यांचा विश्वास संपादन गिफ्ट व पैशाचे आमिष दाखवून आतापर्यंत सुमारे १२ लाख ४७ हजार ३०० रुपये वेळोवेळी भरण्यास सांगून फसवणूक केली आहे. याबाबत नागनाथ भिमराव दुधाळ रा. वासुदरोड दत्तनगर, सांगोला यांनी अनोळखी महिलेविरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments