'या' प्रकरणी दोघा जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल



 बार्शी दहिटणे ते मुंगशी वस्तीवर शेळी पालन केंद्रातून शेळ्या चोरल्याचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग केल्यानंतर दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. तालुक्यातील रस्त्यावरील याबाबत नागनाथ साठी (रा. दहिटणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय शिंदे (रा. सौंदणे, ता. मोहोळ), भुजंग पवार (रा. गावसूद, जि. उस्मानाबाद) यांच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी साठे हे पाहुण्याचा कार्यक्रम असल्याने दहिटणे गावात दुपारी बाराच्या दरम्यान गेले होते. त्यानंतर दुपारी दोनच्या दरम्यान, ते परत आपल्या वस्तीवर आले. असता त्यांना दोन संशयित चोर शेळी कंपाउंडचा कडीकोयंडा तोडत असल्याचे दिसले. त्यांचा पाठलाग केला असता ते मोटारसायकलवरुन दहिटणे गावाकडे पळून गेले.? त्यामुळे गावकऱ्यांना फोन करून दोन चोर गावाकडे पळून आल्याचे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी हुशारीने त्या दोन चोरांना पकडून वैराग पोलिसांच्या ताब्यात दिले.

Post a Comment

0 Comments