माढा |
दोघा मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी बोलावून दोघांचे हात पाय बांधुन अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माढा तालुक्यातील भुताष्टे गावातील धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
पांढऱ्या दोरीने पाठीवर तसेच हाताने अमानुष मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी करुन विकास नाईकवाडे व श्री.कसबे या दोघा मजुरांना गायब केले. माढा पोलिस स्टेशन मध्ये चौघा विरोधात अॅट्रासिटी,मारहाण,व अपहाराचा चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.
भुताष्टे गावातील लाईट पोलचे मुकादम बालाजी मोरे यांच्याकडे विकास नाईकवाडे व श्री कसबे हे दोघे मजुर मागील दोन महिन्यांपासून कामाला होते, कामाचे पैसे घ्यायला ये असे सांगुन या दोघांना बालाजी मोरे,भालचंद्र आनंत यादव यांचेसह एकुण ४ जणांनी पत्र्याच्या खोलीत नेऊन जबर मारहाण केली आहे. चौघांना माढा पोलिसांनी केली अटक केली.
0 Comments