कपुलापूरी ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित कोरोना योध्दयांचा सन्मान

परंडा/प्रतिनिधी :

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित जी प प्रा शाळा कपिलापुरी येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या वतीने शालेय साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.
कपिलापुरी ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे अवचित्य साधून  कोरोना काळात गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन कोरोना  काळात मदत केली असे तरूण व जि प प्रा शाळा शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्यां २४ कोरोना योध्दयांचा शाल श्रीफळ व ग्रामपंचायत सन्मानपत्र देऊन यतोचीत सत्कार करण्यात आला.तसेच विलास भोसले यांच्या कडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ग्रामपंचायत कपिलापुरीस भेट दिली. त्याचबरोबर बी एल ओ कुलकर्णी यांनी निवडणूक आयोग सूचनेनुसार निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी जोडून (लिंक) घ्यावे या विषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी गावचे सरपंच वैभव आवाने,उपसरपंच विलास भोसले,तलाठी गुळमिरे, ग्रामसेवक एस एस राठोड,समाधान ढोरे,पो.पा.धर्मराज पाटील,जी प प्रा शाळा कपिलापुरी मुख्याध्यापक गरड,सह शिक्षक कुलकर्णी,रंजीतकुमार जैन,नितीन शिंदे,श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील,
तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments