भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी एक खळबळ गोष्ट मी केले आहे, शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं व राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजपचं सरकार सत्तेत आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं जवळपास निश्चित असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व अनेक चर्चा रंगल्या.
विदर्भाचा विकास पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजेत, असं वक्तव्य करत अमरावतीचे आमदार रवी राणांनी खळबळ उडवून दिली आहे. तर २०२४ ला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील आणि यासाठी जीवाजी बाजी लावेन, असंही रवी राणा म्हणाले आहे.
दरम्यान,एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजेत, असं वक्तव्य अमरावतीचे खासदार रवी राणा यांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
0 Comments