स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरं केल जात आहे.
अशातच मोदी सरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवत आहे. त्यामुळे या मोहिमे अंतर्गत घराघरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे.
मात्र, केंद्र सरकारच्या याच मोहिमेवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. 75 वर्षे झाली घराचा पत्ता नाही आणि हर घर तिरंगा असे म्हणतात. एका व्यंग चित्राचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
घरच नाही तर तिरंगा लावणार कुठे?
सरकार मायबाप सरकारने हरघर तिरंगा. घर घर तिरंगा. त्यावर एक व्यंगचित्रं काढलंय. कुणी काढलं माहीत नाही. सरकारी बाबूच्या समोर एक माणूस आहे. तो म्हणतोय सर याच्याकडे तिरंगा आहे. पण घर नाही. त्याला घर हवं आहे, असं हे कार्टुन आहे. म्हणजे घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झाली आहे. घर घर तिरंगा. लावा. तुमच्याकडे घरच नाही तर तिरंगा लावणार कुठे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मी कुणावर कॉमेंट करावी म्हणून व्यंगचित्रं दाखवत नाही. 1978 सालीचं हे व्यंगचित्रं आहे. त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. तो काळ भोगलेला वर्ग आहे. त्यांना तो काळ आठवत असेल तर हे त्यांना हे व्यंगचित्रं समजेल असे उदधव ठाकरे म्हणाले. व्यंगचित्रावर वर लिहिलंय परतीचा प्रवास. त्यावर कमेंट केली. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाई सारखा हेकडी माणूस पंतप्रधानपदी बसल्यावर जे व्हायचे ते झाले. मोरारजींची हेकडीवृत्ती लोकशाहीस पुन्हा त्या अंधाऱ्या खाईत घेऊन गेली. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणून हे चित्रं दाखवतोय. त्यामुळे 75 व्या वर्धापन दिनी आपण कुठे आहोत. आपल्या देशातील लोकशाही किती काळ जिवंत राहणार आहे. याचा एक आढावा घेण्याची गरज आहे. आज पाहिलं तर आनंदी आनंद आहे. 75 वा वर्धापन दिन आहे.
0 Comments