सोलापूर! बलात्काराची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेसह एकास अटकपूर्व जामीन मंजूर



सोलापूर /प्रतिनिधी:

 श्रीशैल मल्लेश बिराजदार वय ५६ रा बोरीउमरगा, तालुका अक्कलकोट ,जि सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिद्धम्मा मल्लिनाथ पाटील व सिद्धलिंग बसवनआप्पा पाटील दोघे रा बोरीउमरगा, तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही.भडंग यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
     
 यात हकीकत अशी की,दिनांक 16/12/2021 रोजी श्रीशैल बिराजदार हा शेतामध्ये काम करीत असताना सिद्धम्मा हिने त्यास शेती माझ्या नावावर कर नाहीतर माझ्या नवऱ्याने एक लाख व्याजाने दिले आहेत त्याचे आतापर्यंत 25 ते 30 लाख रुपये झाले आहेत.एक तर शेती माझ्या नावावर कर,नाहीतर पैसे दे असे नाही केले तर बलात्काराची केस करते असे म्हणून धमकी दिली होती. श्रीशैल यास भीती वाटत असल्याने तो अक्कलकोट येथे आला होता. त्यावेळी मल्लिनाथ पाटील व सिद्धम्मा पाटील यांनी त्यास शिवीगाळ करून शेती लिहून घेतली होती.त्या त्रासाला कंटाळून श्रीशैल याने विषारी औषध प्राशन केले होते,अशा आशयाची फिर्याद श्रीशैल याने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना दिली होती. त्यावरून सिद्धम्मा व सिद्धलिंग यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन्यासाठी अर्ज केला होता,तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
   
 त्यावर सिद्धलिंग व सिद्धम्मा यांनी एडवोकेट रितेश थोबडे यांचे मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, अर्जाच्या सुनावणीच्या वेळी एडवोकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात श्रीशैल याचा मृत्यू झालेला नसल्याने आत्महत्येस प्रवृत्ती केल्याचे कलम लागू होत नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सिद्धलिंग यास अटकपूर्व जामीन मंजूर केला तर सिद्धम्मा हीस पुढील तारखेपावेतो तिचे विरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पारित केले. यात आरोपीतर्फे एडवोकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे एडवोकेट एम.आर.तिडके, एडवोकेट ए.आर.कापडणीस यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments