आशिया कपमध्ये कसं आहे हिटमॅन रोहित शर्माचं प्रदर्शन? वाचा आकडेवारी



आशिया कप 2022 सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. भारत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्याने स्पर्धेची सुरुवात करेल. यंदाच्या वर्षी भारताचा फॉर्म पाहता भारत सामना जिंकण्याचा मोठा दावेदार मानला जात आहे.बअशामध्ये भारतीय संघाचं नेतृत्त्व हाती असणाऱ्या रोहितबशर्माचा  आशिया कपमधील रेकॉर्ड

नेमका कसा आहे ते पाहूया... 

या स्पर्धेच्या इतिहासात महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने आतापर्यंत आशिया कपमध्ये 27 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 42.04 च्या सरासरीने आणि 90 च्या स्ट्राईक रेटने 883 रन बनवले आहेत. यादरम्यान नाबाद 111 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. त्याने 7 वेळा 50 हून अधिक धावांचा आकडा पार केला आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरने केलेल्या 971 धावानंतर रोहितच्या 883 धावांचा क्रमांक लागतो.

Post a Comment

0 Comments