कालकथित श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन


कोल्हापूर(३) : कालकथित श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी आणि कालकथित अमोल गुंडा माळवी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिनांक ६ ऑगस्ट, २०२२ रोजी बाजार भोगाव परिसरातील प्राथमिक शाळेत मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

       
पन्हाळा तालुक्यातील वाळोली गावचे सुपुत्र ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मातोश्री कालकथित श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी आणि पुतणे कालकथित अमोल गुंडा माळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत वह्या वाटप घेण्यात येणार आहे.

 समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात मदत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यामंदीर वाळोली, विद्यामंदीर पोहाळे,  प्राथमिक शाळा, साळवाडी, आणि  प्राथमिक शाळा, बाजार भोगाव, ता. पन्हाळा या शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहेत. 
       

Post a Comment

0 Comments