गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात घडलेल्या एका घटनेमुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पोलिसावर बंदुकीची गोळी झाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली-आलदंडी मार्गावर नक्षल शोध अभियान राबवले जात होते. त्यावेळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे पर्यावसन गोळीबारीत झाले. आरोपी संतोष याने पोलीस कर्मचारी विजय करमे यांच्यावर गोळीबार केला.
0 Comments