मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, पंधरा दिवसात निकाल दिसेल, पत्रात उल्लेख


 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. युपीच्या आलमबाग परिसरात राहणारे भारतीय किसान मोर्चाचे नेते देवेंद्र तिवारी  यांच्या घराबाहेर गुरुवारी एक अज्ञात बॅग सापडली. या बॅगेत मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र सापडलं. देवेंद्र तिवारी यांच्या तक्रारीवरुन आलमबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

सलमान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने हे पत्र पाठवलं असून त्यात बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय पत्रात ‘तुम्हाला किती वेळा समजावलं तरीही तुम्ही ऐकत नाही' असा मजकूर लिहिण्यात आला आहे. योगींच्या सांगण्यावर दाखल झालेल्या जनहित याचिकांमुळे आमचे सर्व कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत, आता तुमचे काय हाल होतात ते बघा, पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाल निकाल दिसेल अशी धमकी देण्यात आली आहे. देवेंद्र तिवारी यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे निनावी पत्राची बॅग ठेवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

Post a Comment

0 Comments