एकनाथ शिंदेंना झटका तर ठाकरेंना दिलासा


एकनाथ शिंदेंच्या बंडाने महाराष्ट्रात मोठा राजकिय भूंकप आला होता. मात्र त्याचे धक्के अजूनही जाणवत आहे. उध्दव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले त्यानंतर शिंदेंनी त्यांच्याकडून पक्ष, पक्षचिन्ह आणि सर्वच आपल्याकडे घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठई दोन्ही गट कोर्टात तसेच निवडणूक आयोगात समोरा-समोर उभे आहेत. आता मात्र निवडणूक आयोगाकडून उध्दव ठाकरेंना मोठा दिलासा मिळालेला असून तो शिदेंना झटका मानला जात आहे.

निवडणूक आयोगात पक्ष, चिन्हाबाबत पुरावे सादर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आधी चार आठवड्याचा वेळ मागितला होता तो 23 ऑगस्टला संपला मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे गटाने तब्बल दीड लाख शपथपत्रं सादर केली होती. आणि उध्दव ठाकरेंनी अजूनही तशी शपथपत्रे वा पुरावे अजून सादर केलेले नाहीत. आता आपणास अजून एका महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती ठाकेरंनी आयोगाकडे केली होती. त्यांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यामुळए शिंदे गटाचे टेंशन वाढले आहे.

Post a Comment

0 Comments