आज दिनांक १०/८/२०२२ वार बुधवार रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे चेअरमन रणवीर राजेंद्र राऊत यांच्या तर्फे मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राजेंद्र राऊत होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप मिरगणे यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यानंतर चेअरमन रणवीर राजेंद्र राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या भाषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
" हर घर तिरंगा " अभियान राबविण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून २३०० तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य बी.के.भालके, विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, न.पा. बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, न.पा.बार्शीचे गटनेते आबा राऊत,न.पा. बार्शीचे नगरसेवक भैय्या बारंगुळे,भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, विजय चव्हाण, संदीप मिरगणे,ॲड.केदार पवार,विजय राऊत,युवराज बारबोले, बिट्टू बारंगुळे,छोटू ठोंबरे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद कसबे यांनी केले.
0 Comments