बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न होत नसल्याने एका युवकाने असे काही केले की घरच्यांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील कुचायकोट येथील मठिया गावातील आहे. लग्न होत नसल्याने तरुणाने शनिवारी सकाळी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी उपचारानंतर तरुणाच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मठिया गावातील हा युवक परदेशातून परतला होता. मागच्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होती. मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने यंदा त्याचे लग्न करुन देणे शक्य नव्हते. मात्र त्या तरुणाला ते अजिबात मान्य नव्हते. त्याला याचवर्षी लग्न करायचे होते त्यासाठी तो घरच्यांवर दबाव टाकत होता. घरच्यांनी नकार दिल्यावर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
तरुण त्याच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडल्याने घरच्यांना धक्का बसला. शेजारच्या लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, तरुणाला शुद्धीत आल्यावर त्याचा जबाब नोंदवून घटनेची सत्यता शोधण्यात येईल. याप्रकरणी पोलिसांनी नातेवाईकाची चौकशी सुरु केली आहे.
0 Comments