उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात असणाऱ्या तांदुळवाडी या गावातील शेतकरी सुभाष उंबरे देशमुख यांचा शेतीच्या विषयावरून वाद सुरू होता. आणि शेतीच्या नुकसानीमुळे जीवनाला कंटाळून अधिवेशनावेळी २३ ऑगस्ट रोजी मुंबई विधान भवन बाहेर सुभाष देशमुख यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. त्यांनतर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. देशमुख यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम आदमी शेतकरी संघटना त्यांच्या सोबत आहे. तरी या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार असलेले केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये शिंदे सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जवळपास शंभरहून अधिक शेतकऱ्यांना आत्महत्या करून आपला जीव गमवावा लागला आहे.
तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना आम आदमी शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती आहे की लवकरात लवकर सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जीवनभराचा उदरनिर्वाह होईल अशी त्वरित मदत जाहीर करावी. आणि ज्या काही एक ते दीड महिन्यामध्ये शिंदे सरकारच्या काळात शंभरहून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही लवकरात लवकर मदत जाहीर करावी. अन्यथा आम आदमी शेतकरी संघटना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरावा घालून जाब विचारेल. आणि इथून पुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घेतलेल्या चुकीचे निर्णयांचा,योजनांचा फेरबदल करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता प्रभावी उपाययोजना राबववी. अशी मागणी आम आदमी महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार यांनी केली यावेळी आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील, संघटक बाबासाहेब चव्हाण, सहसचिव दिलीप सुरवाडे, मार्गदर्शक श्रीकांत आचार्य आदी उपस्थित होते.
0 Comments