सोलापूर : मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आले असताना विनायकराव मेटे यांचे निधन दुर्दैवी आहे.त्यांच्या जाण्याने आरक्षणाची ही चळवळ थांबणार नाही किंबहुना ती अधिक बुलंद करणे हीच खरी स्व विनायक मेटे यांना श्रद्धांजली ठरेल. त्यासाठी समाजाने ताकद एकवटली पाहिजे अशी अपेक्षा शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी व्यक्त केली.
शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापुरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तानाजीराव शिंदे बोलत होते. मेटे यांच्या प्रतिमेचे पूजन शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि तानाजीराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे , विक्रम देशमुख , अशोक मुळीक , मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील , सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार , दत्तामामा मुळे , अमोल बापू शिंदे , राजन जाधव विनोद भोसले , श्रीकांत घाडगे , सचिन गायकवाड , विनोद पाटील , आकाश पवार ऍड सुरेश गायकवाड , सुनील नागणे , माऊली झांबरे, आण्णासाहेब पाटील,सागर गायकवाड , विलास कोल्हे यांनी स्व विनायक मेटे यांच्या विविध क्षेत्रातील कामाची माहिती देताना चळवळीचा , संघर्षाचा आढावा घेतला .
याप्रसंगी उत्तर सोलापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शालिवाहन माने देशमुख, तानाजीराव जाधव , ज्ञानेश्वर इंगोले , बाबासाहेब जाधव, लहू गायकवाड ,विजय क्षीरसागर, माऊली जाधव गंगाधर गायकवाड, शाम पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments