बार्शी! जुन्या वादातून दोघांला लाकडी दांडक्याने मारहाण; ४ जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी शहरातील संतोषी माता चौकाजवळ जुन्या भांडणाच्या वादातून दोघाला लाकडी दांडक्याच्या साह्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे, जखमी वर शहरातील हिरेमेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल विनायक खंडागळे (वय ५०) , रा. संतोषी माता चौक, केजकर हॉस्पीटल जवळ बार्शी यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे, ६ ऑगस्ट दिवशी फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा नंदू भस्मे यांच्यासोबत क्षीरसागर नावाचे व्यक्तीचे भांडण झाले होते, तो वाद तेथेच मिटला होता. ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी मिळून ला तालुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. शेजारी घराजवळ आल्यावर त्या तिघांनी तिथून पळ काढला होता. फिर्यादी व नंदू भस्मे या दोघांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी १ ) क्षिरसागर, पुर्ण नावपत्ता माहीत नाही २ ) भिसे महिला तिचे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ३) नवनाथ चौगुले ४) दादा भिसे या चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments