सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सात वाजता आयकर विभागानं अचानक एकच वेळी धाडी टाकण्यात आले. ५७ तासांनंतर तपासणी सुरुच आहे. तीन दिवस झाले आयकर विभागाचे अधिकारी सोलापूर शहरातील ७ ठिकाणी तळ ठोकून आहेत. सोलापुरातील डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर, डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक तसेच रघोजी किडनी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्यापही तपासणी सुरुच आहे. तर बांधकाम व्यावसायिक बिपीन पटेल यांच्या कार्यलाय, घर या ठिकाणी आयटीचे अधिकारी तपास करत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील साखर सम्राट अभिजीत पाटील यांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
कोविडचा दोन वर्षाच्या काळानंतर सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आयटीच्या रडारवर आल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. गेल्या ५६ तासांमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायिक असतील किंवा डॉक्टर यांच्या कार्यालयाची तपासणी केली आहे तर काही ठिकाणी बँकेतील खात्यांची चौकशी केली जात आहे. सोलापूर अशा प्रकारे तपासणी सुरू असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ झाली आहे.
ज्या ज्या ठिकाणी तपासणी सुरु आहे, त्या त्या ठिकाणी पोलीस तळ ठोकून आहेत. सोलापुरात जवळपास सात ठिकाणी आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती रडारवर आहेत. या संदर्भात आयकर विभागाने प्रसार माध्यमांना दूरच ठेवल्याचे दिसून आले. मात्र या सर्व धाडींची प्रक्रिया किती तास चालू राहणार हे पाहण्यासारखे असणार आहे या आयकर विभागाच्या हाती काय लागणार उत्सुकता ही लागून राहिली आहे.
सोलापुरातील या सात ठिकाणी छापेमारी सुरु
1) मेहुल कन्स्ट्रक्शन (सोलापूर)
2) अश्विनी हॉस्पिटल (सोलापूर)
3) अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी (सोलापूर)
4) व्यावसायिक बिपीन पटेलांच्या घरी (सोलापूर)
5) स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल (सोलापूर)
6) डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक (सोलापूर)
7) रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल (सोलापूर)
0 Comments