वैराग! राळेरास येथे मोटार सायकल घसरून एकाचा जागीच मृत्यू



वैराग/प्रतिनिधी:

रामलिंग येथे मोटार सायकलवरून देव दर्शनासाठी निघालेल्या एकाचा राळेरास येथे मोटार सायकल घसरून गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला, रामलिंग (ता.उस्मानाबाद ) येथे देव दर्शनासाठी आष्टे (ता .मोहोळ ) येथील पोपट चंद्रकांत गावडे ( वय ३२) हे आपला लहान मुलगा दादासाहेब  गावडे (वय ८) यास राळेरास मार्गे बुलेट मोटारसायकल (एम एच १३ बी एल ०१९७ ) वरून घेवून निघाले होते . दरम्यान राळेरास येथे धामणगाव पाटीवर मोटर सायकल घसरल्याने पोपट  गावडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच मयत झाले सदर अपघात सकाळी  साडे आकरा वाजण्याच्या सुमारास झाला यात लहान मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. अधिक तपास हवालदार अमोल  भोरे  करित आहेत.

Post a Comment

0 Comments