कोल्हापूर जिल्ह्य़ातील साजणी येथील कु.वर्षा कांबळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.ते तिच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते.
वर्षा हि गावातील डाॅ.शरद पाटील यांच्या साई क्लिनिक मध्ये काम करत होती आणी तिथेच तिचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला आहे. तिच्या आई वडीलांच्या म्हणण्यानुसार वर्षा हिने आत्महत्या केली नसुन तिची हत्या करण्यात आली आहे.त्यात डाॅ.शरद पाटील साजणी गावाच्या पोलिस पाटिल शाहिना जाकीर फरास यांचा पती जाकीर हुसेन फरास व हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांची भुमिका ही संशयास्पद असुन तिच्या वडीलांना गावातील महिला पोलिस पाटील यांचा पती जाकीर हुसेन फरास व डाॅ.शरद पाटील यांनी वर्षा हिची काहीच खरी माहीती दिली नाही.वर्षाचे वडील भोपाल कांबळे यांना एक अर्ज लिहून त्यावर त्यांचा अंगठा घेतला असुन हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे होते .परंतू त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे मुख्य आरोपी असलेल्या डाॅ.शरद पाटील याच्यासह पोलिस पाटलांचे पती व हातकणंगले पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांना देखील सह आरोपी करण्यात यावे असे कांबळे म्हणाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रविण कांबळे, किसन कांबळे ,सुखदेव गरड, आदी समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments