सोलापूर! विजापूर रोड येथे कुंटणखाण्यावर छापा; महिलेस अटक



सोलापूर/प्रतिनिधी:

विजापूर रोड जवळील आरटीओ ऑफीस जवळ बेन्नुर नगर येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारून एका पीडित महिलेची सुटका केली. तर कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक केली.

या गुन्ह्यातील महिला आरोपी हिने आपल्या राहत्या घरात एका पीडित महिलेस अटकावून ठेवून तिची शारीरिक पिळवणूक करून तिला पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करून एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे.

महिला आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची दि. ०७ ऑगस्ट२०२२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष कडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments