सोलापूर:
अविवाहित महिलेच्या इच्छेविरुध्द शारीरीक अत्याचार करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. श्रीकांत देशमुख यांना 26 ऑगस्टपर्यंत पोलिसांनी अटक करू नये असे आदेशही जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. देशमुख हे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती देण्यात आली.
श्रीकांत देशमुख यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. सरकारी वकील ऍड प्रदीप सिंह राजपूत यांनी विविध मुद्द्यांवरून युक्तिवाद केला. यावेळी युक्तिवादाच्या आधारे जिल्हा न्यायालयाने देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख यांना जिल्हा न्यायालयाकडून मात्र दिलासा मिळाला. दोन दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी देशमुख यांना तात्पुरती मोकळीक दिली आहे.
२६ ऑगस्टपर्यंत त्याना अटकेपासून अभय मिळाले आहे. न्यायालयाने देशमुखांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
0 Comments